
दै.चालु वार्ता लातूर जिल्हा प्रतिनिधी
राठोड रमेश पंडित
लातूर:- अहमदपूर येथील भास्कर दत्तात्रय मुंडे यांचे चि. स्वरीत भास्कर मुंडे याचे जवाहर नवोदय परीक्षेत घवघवीत यश. स्वरीत भास्कर मुंडे आपली जिद्द आणि चिकाटी अभ्यासातील सातत्य, मेहनतीच्या जोरावर जवाहर नवोदय इयत्ता सहावी प्रवेश परीक्षा 2023 मध्ये उज्वल यश संपादन करून मुख्य यादीत आपली निवड निश्चित करून नवोदय साठी पात्र झाल्याबद्दल त्याचे सर्व स्तरावरून कौतुक व अभिनंदन याचा वर्षाव होत आहे. त्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक जी , एस बिरादार, तसेच मार्गदर्शक गणेश जाधव सर ,व्ही.के. कराड सर ,श्रीकांत सर ,पुणे मॅडम ,एस पी केंद्रे, डी. के.केंद्रे सर ,श्रीनिश मुंडे, शुभ्रा मुंडे या सर्वांच्या वतीने स्वरीतचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. स्वरीतला भविष्यात असेच घवघवीत यश मिळत राहो अशी शाळेच्या व मित्रमंडळीच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत…