दै.चालु वार्ता
उपसंपादक पुणे जिल्हा,शाम पुणेकर
पुणे : महाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांना आता त्यांच्या नातेवाईकांशी स्मार्ट कार्ड फोनद्वारे संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहा तर्फे या नाविन्यपूर्ण सेवेची चाचणी घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (तुरुंग आणि सुधारात्मक सेवा), अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास, स्मार्ट कार्ड फोन उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्स देण्यात आला होता. मात्र, बाजारात कॉईन बॉक्सेसची उपलब्धता नसल्याने तसेच विविध सुविधा बंद केल्यामुळे कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील संवादात अडथळा निर्माण झाला होता.
याव्यतिरिक्त, उच्च-सुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड आणि विभक्त सेलमधील कैद्यांनाही त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी कॉईन बॉक्सवर ऐवजी काही तुरुंग अधीक्षकांनी सुरक्षेतेच्या दृष्टीने बॉक्सऐवजी बेसिक मोबाईल फोन वापरण्याचा प्रस्ताव दिला. परिणामी एडीजी गुप्ता यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात चाचणी तत्त्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा लागू करण्याची शिफारस केली आहे.
२३ जूनपासून, पात्र कैदी महिन्यातून तीन वेळा संपर्क सेवा घेऊ शकतात, प्रत्येक सत्र दहा मिनिटे चालते. यामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहणे सोपे झाले आहे. नातेवाईक आणि वकिलांशी संवाद साधण्याची क्षमता केवळ कैद्यांना अनुभवत असलेला मानसिक ताण कमी करणार नाही. तर तुरुंगातील सुरक्षा वाढवण्यातही योगदान देईल. शिवाय तुरुंगात असलेल्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा असल्यामुळे
येरवडा कारागृहातील स्मार्ट कार्ड फोन सुविधेचा आढावा घेतल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राज्यातील इतर कारागृहांमध्ये करण्यात येणार आहे…


