
दै.चालू वार्ता.
प्रतिनिधी समाधान कृष्णा कळम वडोद तांगडा
भोकरदन : वडोद तांगडा :- दिपभारती माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय वडोद तांगडा येथे शिष्यवृत्ती पात्र आणि वर्ग १०वी व १२वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.
आज शनिवार दि. 24 जून रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडोद तांगड्याच्या सरपंच सौ मनीषाताई वासकर तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक डॉ सी आर तांदूळजे हे होते. यावेळी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी व मार्च 2023 मध्ये पार पडलेल्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात आले.*
*याप्रसंगी प्रास्ताविक करताना विद्यालयाचे प्राचार्य श्री एस टी कर्वे यांनी शैक्षणिक वर्ष 2022-23 या वर्षात शाळेने मिळवलेल्या यशाचा लेखाजोखा मांडून येणारा वर्षातील शैक्षणिक विकासासंबंधीचा आराखडा मांडला. प्रमुख पाहुणे डॉ सी आर तांदूळजे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना मिळालेल्या यशाबद्दल कौतुक करून याचा उपयोग स्वतः व समाजासाठी कसा होईल याचे मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सौ मनीषाताई वासकर यांनी विद्यार्थिनींनी कोणत्याही क्षेत्रात मागे न पडता प्रत्येक क्षेत्रात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी श्री वर्धमान सेट वासकर व श्री पंढरीनाथ तांगडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास श्री नारायण शेठ तांगडे, श्री पंडितराव लुटे, श्री गोपाल तांगडे, श्री सुभाष साळवे, श्री दादा बर्डे, श्री नाना तांगडे समाधान कळम दै.चालू वार्ता. पत्रकार, श्री एस एस गवळी, श्री एस आर तांगडे, श्री जी जी खरात, श्री व्ही एन खनपटे, श्री वाय एस लुटे, श्री के एस शेजुळ, श्री सी एन जाधव, श्री के पी मस्के, श्री जी आर चव्हाण व गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस पी रगडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री आर के लुटे यांनी केले…