
दै.चालु वार्ता परंडा प्रतिनिधी
धनंजय गोफणे
परंडा-परंडा तालुक्यातील ता.२४ आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोंजा हवेली येथे शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचं भवितव्य घडविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेणार्या सावित्रीबाई फुले यांचे पुजन करून उत्कृष्ट कामगिरी बजावणारे श्री. हनुमंत पाटील सर यांचा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने निरोप समारोप तर नुतन शिक्षण प्रेमी शिक्षक कवी सम्राट वारकरी संप्रदायात यशस्वी मार्गदर्शन करणारे गुरू बाळासाहेब घोगरे व श्री पवार सर यांचा सत्कार करून पुष्पगुच्छ देण्यात आले.
जि प प्रा शाळा भोंजा हवेली शाळेत ५५ विद्यार्थी पट संख्या असणारा हनुमंत पाटील सर यांनी गावात वेळी वेळी पालकांना जागृत करून कुभेंजा व भोंजा येथून तब्बल १०१ विद्यार्थी पट संख्या करुन शाळेची गुणवत्ता वाढीसाठी महत्वाचे योगदान दिले व जाताना शालेय विकासासाठी ५००० रुपयांचा लोकसहभाग दिला या बद्दल गावातील नागरिकांनी आभार मानले व पुढील शैक्षणीक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देऊ केल्या यावेळी सरपंच राणी समाधान कोळी, उपसरपंच वस्ताद शिवाजी घाडगे, अध्यक्ष सुब्राव मोरे, उपाध्यक्ष अमोल नेटके, मुख्याध्यापक बाळासाहेब घोगरे, डायरेक्टर गणेशदादा नेटके, सदस्य हनुमंत जगताप, बाळासाहेब नेटके, समाधान कोळी, हनुमंत काशीद, लक्ष्मण कोकाटे, उद्योजक कैलास भांदुर्गे, बिरमल कोंडलकर शिक्षक वृंद आदिकराव शेळवणे सर, पवार सर, श्रीम. राऊत, श्रीम. माळी, सदस्य माधुरी सरवदे, पल्लवी सावंत, आका सरवदे इ. उपस्थित होते…