
जि.प.बांधकाम विभागाच्या वतीने कपडेरुपी आहेर देवून सत्कार.
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी
शिवकुमार बिरादार
मुखेड पंचायत समिती कार्यालयात शाखा अभियंता म्हणुन कार्यरत असलेले रहीमसाब शेख हे ३४ वर्ष २ महिने कार्यसेवा बजावल्यानंतर नियत वयोमानानुसार दि.३० जुन रोजी सेवानिवृत झाले त्याबद्दल त्यांचा जि.प बांधकाम उपविभागाच्या वतीने कपडेरुपी आहेर व भेटवस्तु देवुन निरोप देण्यात आला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सेवापूर्ती सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी.गंगथडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन गटविकास अधिकारी सि.एल.रामोड, कार्यकारी अभियंता ए.आर.चितळे, उपाभियंता पि.एम.रायभोगे, शाखा अभियंता व्हि.डी.चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.कार्यक्रमाप्रसंगी सत्कारमूर्ती शाखा अभियंता रहीम शेख यांना प्रथमतः जि.प.बाधकाम विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता एस.जी.गंगथडे, उपाभियंता पि.एम.रायभोगे यांनी कपडेरुपी आहेर व भेटवस्तु देवून यथोचित सन्मान केला त्यानंतर कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी सत्कार करुन पुढील आयुष्य सुखाचे,आरोग्य संपन्न, समृद्धीचे जावो अशा शुभेच्छा दिल्या यावेळी माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, अंतेश्वर पाटील बिल्लाळीकर, माजी प.स.सदस्य जे. बी.कांबळे, सरपंच पांडुरंग पाटील वड्डेर, पत्रकार संघाचे जिल्हा संघटक संदीप कामशेट्टे, जेष्ठ पत्रकार सुशील पत्की, अॅड सुनील पौळकर, जि.प.हा.मुलींचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेताब शेख, पत्रकार संघाचे सचिव अनिल कांबळे, जि.प.बांधकाम विभागाचे इंजिनियर सुधाकर करखेलवार, मलिकार्जुन हिरेमठ आप्पा, बालाजी रोडगे, नागेश्वर स्वामी, ग्रामसेवक नजीरसाब सय्यद, ग्रामसेवक नागेश्वर, ग्रामसेवक गजानन मामीलवाड, ग्रामसेवक मैफुजदीन मनियार, राजू सूवर्णकार, प्रकाश भांगे, जयवंत पाटील,रणजित पा.उमाटे, राहुल काळे, बालाजी नागलपल्ले, शिवाजी कुंडगीर,शंकर बुरावाड,शंकर पाटील, प्रभु चव्हान, शमीसाब शेख, मारोती पुठ्ठेवाड, धनु राठोड, अशोक देवकत्ते, विठ्ठल पाटील यांच्यासह यांच्यासह विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, पत्रकार, प.स.कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन इंजिनियर गंगाधर इंगळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार इंजिनियर एस.व्ही.जवादवार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी जि.प.बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले…