
लोहा प्रतिनिधी दै.चालू वार्ता
मुख्य संपर्क प्रमुख भरत पाटील पवार
मौ.सोनखेड येथील श्री शिवाजी मा.व उ.मा.विद्यालयात संस्थापक व संचालक, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी,माजी खासदार व आमदार, शिक्षणमहर्षी,लोकनेते आदरणीय दिवंगत डॉ. भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचा १०२ वा जयंती सोहळा श्री शिवाजी मा.व उ.मा.विद्यालय सोनखेड येथे गुराखी परंपरेनुसार साजरा करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बाबारावजी देशमुख (शालेय समिती अध्यक्ष) प्रमुख पाहूणे श्री प्रा.धनंजय पा.पवार (संस्था सदस्य) तर मार्गदर्शक वक्ते म्हणून श्री शंतनू डोईफोडे संपादक (दै.प्रजावाणी, श्री गोवर्धन बियाणी जिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार संघ नांदेड तथा संपादक दै.प्रजावाणी) हे उपस्थित राहणार आहेत.
तरी परिसरातील पालकांना कार्यक्रमाला दि.०४/०७/२०२३ रोजी मंगळवार सकाळी १०:०० वाजता श्री शिवाजी मा.व उ.मा.विद्यालय सोनखेड येथे उपस्थित राहण्याची विनंती शालेय समितीचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबारावजी देशमुख, विद्यालयाचे प्राचार्य भगवान पवळे, उपमुअ इश्वर शेटे, उपप्राचार्य परशूराम येसलवाड, पर्यवेक्षक मधुकर वानखेडे,MCVC प्रमुख रमेशराव कदम व सर्व शिक्षक यांनी केली आहे…