
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नारायणा इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. हा दिवस गुरुसाठी समर्पित केला गेला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणतून आपल्या गुरूंना भरभरून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.मुख्याध्यापक शिवाजी केंदे सर तर प्रमुख पाहुणे म्हणून मा. मुसळे सर कुलकर्णी सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी येरमवर व शुभांगी टिमकीकर ह्यांनी केले. गुरूपौर्णिमा कार्यक्रमाचा समारोप धमलवार सर यांनी केला . हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृद यांचे बहुमोलाचे सहकार्य केले.