
दैनिक चालु वार्ता
उपसंपादक मोहन आखाडे छत्रपती संभाजीनगर
सिडको वाळूज महानगर-1 भागातील चित्रकार हर्षद खांड्रे यांच्या संकलपनेतून साकार झालेलं संजीवनी क्रियेशन आयोजीत भव्य चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन
पारनेर, नगर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार निलेश लंके
यांच्या हस्ते झाले, त्याचप्रमाणे लंके साहेबांनी विद्यार्थ्यांचे
व आयोजकांचे भरभरून कौतूक केले. हे कला प्रदर्शन ३० जुन ते ६ जुलै पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. मान्यवरांनी याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्याचाही सत्कार केला,डिझाईन क्षेत्रामध्ये मोठ-मोठ्या संस्थांमध्ये संजीवनी क्रियेशनचे विद्यार्थी आपले नाव उंचावत आहेत. त्यापैकी प्रतिक्षा रसाळ (IIT GUWAHATI) प्रज्ञा होवळ (NIFT Mumbai) ईशा देशपांडे (IIIT JABALPUR), आरोही चव्हाण (NIFT MUMBAI), सई काळे (SPA DELHI ARCHITECTURE). संजीवनी क्रियेशनचे सर्वेसर्वा चित्रकार हर्षद शिवाजी खांड्रे यांनी सर्वांना चित्रकला प्रदर्शनासाठी आमंत्रीत केले आहे व त्याचप्रमाणे डिझाईनिंग क्षेत्रामध्ये येण्याचे आवाहन केले.
या कलाप्रदर्शनाचे सर्वत्र कौतूक होत आहे.६ तारखे पर्यंत आपण या प्रदर्शनाचा लाभ घेऊ शकता.