
शरदचंद्रजी पवारांच्या दौऱ्यादरम्यान होते कर्तव्यावर
अंबड प्रतिनिधी
ज्ञानेश्वर साळुंके
सातारा जिलहा पोलीस दलातील शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार सोमनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब सोमवारी सातारा दौऱ्यावर आले होते. या शरद पवारांच्या सातारा दौऱ्यात हजारों कार्यकर्ते गाड्यांचा ताफ्यांसह त्यांच्यासोबत होते. त्यामुळे वाहतूक पोलिसांची टप्प्याटप्प्यावर नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान महामार्गावर कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे हृदयविकारांच्या धक्क्यांने अचानक दुर्दैवी निधंन झाले. सोमनाथ शिंदे असे या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांचे नाव आहे. आपल्या कर्तव्यावर असताना अचानक पोलीस हवालदार शिंदेना हृदयविकारांचा तीव्र धक्का बसला. पोलीस सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सोमनाथ शिंदे हे सातारा शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांच्या अचानक जाण्यांमुळे संपूर्ण सातारा जिल्हा पोलीस दलात शोककळा पसरली. सोमनाथ शिंदे यांचे निधनांची बातमी सातारा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह सातारा जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. सोमनाथ शिंदे हे २००६ मध्ये पोलीस भरती झाले होते. त्यांचे पोलीस होण्यांचे स्वप्न चांगलेच होते. त्यांच्या आत्तापर्यंत पोलीस दलात सतरा वर्ष त्यांनी उत्कृंष्ट सेवा बजावली. प्रत्येकांशी हसून बोलून आणि प्रत्येकांच्या प्रसंगात पाठीशी उभे राहणे ही वृत्ती असल्यांने पोलीस मित्रांसोबत त्यांचा बाहेरील मित्रपरिवार मोठा होता. त्यांच्या निधनांची बातमी सातारा जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. सोमवारी त्यांच्यावर शासकीय इतमामांत सातारा जिल्हा पोलीस दलाकडूंन मानवंदना देवुन अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पार्थिंवांचे अंत्यदर्शन घेतले, सोमनाथ शिंदे यांचे मूळगांव वेळे-कमिठी पण आपल्या नोकरीनिमिंत्त आपल्या कुटुंबासोबत साताऱ्यातच वास्तव्यांस होते. पोलीस हवा. सोमनाथ शिंदे यांच्या पश्चांत आई वडील पत्नी मुलगा आणि एक मुलगी व भाऊ असा त्यांचा मोठा परिवार होता…