
सुंदर अंधारे व राजेंद्र बोरा पोषणकर्त्यांना स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा दिला…
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
धाराशिव:-भूम तालुक्यातील सावरगाव (दरेवाडी) ग्रामपंचायात मधील अपहाराबद्दल सरपंच व संबंधीतावर गुन्हा दाखल करण्यासह विविध मागण्यासाठी सुंदर अंधारे व राजेंद बोराडे यांनी पंचायत समिती कार्यालया समोर अमरण उपोषण सोमवार दि.३ जुलै पासून सुरु केले आहे. येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बी.आर. ढवळशंख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील सावरगांव (दरेवाडी) येथील ग्रामपंचायतच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह पदाधिकारी यांनी मोठया प्रमाणावर विकास कामासाठी आलेल्या शासकिय निधीचा व जी.एस.टी. ८७ हजार ८२ रुपयाचा अपहार झाल्याचे दि.१२ मे २०२३ रोजीच्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. तसेच १५ व्या वित्त आयोगातील रक्कमेचा खर्च हा नियमानुसार केलेला नसून बिले बनावट आहेत. यामध्ये अनिमियतता केल्याचे नमूद केले आहे. बँकेतुन उचलेल्या रक्कमेबाबत मोठा अपहार उघडपणे दिसून येत आहे. तसेच या प्रकरणी उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देऊनही सरपंच यांनी खुलासा सादर न करता ग्राम पंचायती कडील असलेल्या कागदपत्राची माहिती मागून वेळकाढूपणा केला जात आहे. यासर्व प्रकरणी सरपंच व संबंधीत पदाधिकारी यांचेविरुध्द तात्काळ फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याचे कर्तव्य असतानाही कार्यवाही होत नसल्याने सुंदर आंधारे व राजेंद्र बोराडे यांनी सदर प्रकरणात तात्काळ दोषी व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर न्याय मिळे पर्यंत आमरण उपोषण सुरु केले आहे. तालुक्यातील भ्रष्टाचार झालेल्या सावरगांव दरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह पदाधिकार्यावर तात्काळ कारवाईसाठी बसलेल्या उपोषणकर्त्यांना स्वराज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन राज्य कार्य कारणी सदस्य अँड. विलास पवार, उपाध्यक्ष अँड. अरविंद हिवरे, तालुका अध्यक्ष गणेश नलवडे, निलेश वीर, समर्थ हुंबे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पाठिंबा दर्शविला आहे.