
दैनिक चालू वार्ता
उप संपादक धाराशिव
नवनाथ यादव
धाराशिव:- भूम शहरातील रविंद्र हायस्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.माजी विद्यार्थी विशाल आण्णा चोरमले याची भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई येथे वैज्ञानिक अधिकारी पदी निवड झाली असून त्याबद्दल त्याचा रविंद्र हायस्कूलच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमावेळी भुम शहराचे पोलिस निरीक्षक सुर्यवंशी साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी संस्था सचिव आर.डी.सुळ यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थी विशाल चोरमले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे मुख्याध्यापक धनंजय पवार, उपमुख्याध्यापिका शर्मिला पाटील सर्व शिक्षक उपस्थित होते…