
स्पर्धा परीक्षेचा अवघ्या तीन दिवसांत केला निकाल जाहीर..
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : जिल्हा परिषद कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक वर्गीय कर्मचारी यांच्याकरिता वरिष्ठ सहाय्यक लिपिक वर्गीय होण्याची स्पर्धा परीक्षा घेण्यात येते सदरहू गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय आयुक्त यांनी २५ जून २०२३ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल अवघ्या तीन दिवसातच म्हणजे २८ जून २०२३ ला जाहीर केला.संबंधित निकाल आतापर्यंत कोणत्याही विभागा अंतर्गत एवढ्या तात्काळ देण्यात आलेला नव्हता.कर्मचाऱ्यांकरिता न्यायाची भूमिका बजावून विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांनी निकाल जाहीर केला.करिता जिल्हा परिषद लिपिक वर्गीय संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ.निधी पाण्डेय यांचे आभार मानले.
आभार मानतेवेळी पंकज गुल्हाने,संजय येवतकर,संजय राठी,शरद चहाकर,सतीश पवार,विजय कोठाळे ,हेमंत येवले,चंद्रशेखर टेकाळे,प्रवीण जिचकर,निलेश तालन,तुषार पावडे,सुजित गावंडे,सुदर्शन भोसले,तुषार वडतकर,नितीन तायडे,अर्चना निलंगे,अविनाश थोरात उपस्थित होते…