
गुरूंचे स्मरण करण्याचा मंगल दिन म्हणजेच गुरु पोर्णिमा प्रा.संजय पवार…
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
नांदेड कंधार : योगीराज प्रतिष्ठान वर्ताळा तांडा ता.मुखेड द्वारा संचलित स्टार पब्लिक स्कूल दिग्रस (बु) येथे गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या संस्थेचे सचिव तथा प्राचार्य संजय जी.पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पालक डॉ.शिवाजी बनसोडे, संदिप गोरे, बालाजी पांचाळ, कैलास बनसोडे, मोहित कुलकर्णी, संतोष मंग्याळे, माधव चिंचोले, अंतेश्वर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.पवार यांनी भारतातील शिक्षण पद्धतीत गुरु शिष्य प्रथेला फार महत्व आहे. तर आपले पहिले गुरु आई-वडीलच असतात, दुसरे गुरु शिक्षक व तिसरे गुरु म्हणजे अध्यात्मिक गुरु असतात. माता-पिता गुरुबद्दलची निष्ठा जागृत ठेवण्याचा, गुरुचे स्मरण करण्याचा, गुरूच्या आज्ञेचे पालन करण्याचा मंगल दिन आहे असे पवार सरांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी या शाळेचे प्राचार्य संजय जी.पवार, शिक्षिका अस्मिता राठोड, सुरेखा पवार, पुजा मुदळे, यांनी परिश्रम घेतले.