
दै.चालु वार्ता
चाकूर तालुका प्रतिनिधी
किशन उद्धवराव वडारे
चाकूर शहरातील बोथीरोड हा रस्ता चाकूरचा केंद्रबिंदू असून हा उदगीर व शेजारील खेड्यापाड्यांना जाणारा मुख्य रस्ता असल्यामुळे, त्याठिकाणी सतत वाहनांची व खेड्यापाड्यातून येणाऱ्या लोकांची खूप मोठी वर्दळ असते, गतवर्षीच व्यापाऱ्यांनी केलेले पोलीस यंत्रणेमार्फत अतिक्रमण हटवून बोथीरोड येथील वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र रस्ता व दोन रस्त्याच्या मधोमध दुभाजक टाकून सिमेंट रस्ता रुंदीकरनाचे उत्कृष्ट दर्जाचे काम पूर्ण झालेले आहे, परंतु संबंधित विभागाकडून व लोकप्रतिनिधिंकडून अद्यापपर्यंत रोडच्या साईडने नालीचे काम पूर्ण न झाल्याने पावसाळ्यात पडलेले पावसाचे पाणी रोडवर थांबल्यामुळे त्याचा त्रास व्यापाऱ्यांना तर होतच आहे, पण रस्त्यालगतच डॉ. नागिमे व माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे व इतरही रहाते घरे असून जोराचा पाऊस झाल्यानंतर पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारी सर्व घाण तेथील जवळपास असलेल्या घरामध्ये जमा होत असल्याने येथील स्थानिक लोकांना भयंकर रोगाचा सामना करावा लागत आहे.
त्याच ठिकाणी चाकूर तालुक्यातील नामांकित साई हॉस्पिटल असून सदरील हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सारखी वर्दळ असते, हॉस्पिटलच्या समोरच रोडवर अंदाजे एक ते दीड फूट पाणी साचल्यामुळे संपूर्ण रस्ता ब्लॉक होत आहे, जर एखादा इमर्जन्सी पेशंट हॉस्पिटलमध्ये आला तर त्याला हॉस्पिटलमध्ये जाणे म्हणजे तारेवरची कसरत करत, जीव मुठीत धरून जाण्यासारखं आहे, तसेच रोडवर थांबलेले पाणी जवळपास असलेल्या दुकानात घुसत असल्यामुळे व्यापाऱ्याचा माल व वस्तू भिजल्याने त्याचा त्रास स्थानिक व्यापाऱ्यांना..