
दैनिक चालू वार्ता
शहर प्रतिनिधी अहमदपूर हाणमंत जी सोमवारे
अहमदपूर प्रतिनिधी :- अहमदपूर तालुक्यात 31 ग्रामपंचायत 33 अंगणवाडी यांना मिळणार नवीन 33 अंगणवाडीकरिता उच्च शिक्षित व शिक्षित अंगणवाडी मदतनीस कर्मचारी, म्हणून या वेळी एन.ई.पी 2020 च्या शिक्षण धोरणानुसार 03 ते 18 पर्यंत वयोगटातील सर्व बालकांना शिक्षण मिळावे यासाठी ,शासनाने बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 प्रमाणे याही मुलांना मिळणार शिक्षणाचं अधिकार त्याप्रमाणे शिक्षित व उच्च शिक्षित तर काही पात्र उमेदवार या भरती प्रक्रिया दिसून आले आहे, यांना एकत्रित मानधन 6500/- गावपातळीवर शासकीय निकषांनुसार मिळते अहमदपूर तालुक्यातील शेवटची दिनांक 26जुन 23 रोजी होती यात अर्ज करण्याची अंतिम तारीख पर्यंत एकुण अर्ज प्राप्त 169 झाले असून यांची अर्जाची पडताळणी करणे महत्त्वाचे कामकाज तालुका स्तरावर वरिष्ठांनकडुन सुरू आहे.यात शिक्षित अर्जदार आहेत.एम.ए 06,एम.ए.बि.एड.1, तर बि ए.बि एड 4, बि ए.34 ,तर 12वी पासधारक उमेदवार 127 असुन याप्रमाणे तालुक्यातील 33 जागे करिता नवीन अंगणवाडी मदतनीस म्हणून मिळणारं आहेत तर कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे मते समाधान व्यक्त केले आहे…
बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे मते
यापुर्वी इयत्ता 10 वी शैक्षणिक पात्रता असणारी मदतनीस आता नवीन धोरणानुसार हुशार व बालकांना सहज समजू शकते असं कर्मचारी मिळतील त्यामुळे बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यास सहज मदत होईल. श्रीमती घोडके एस के बालविकास प्रकल्प अधिकारी अहमदपूर..