
महावितरण कंपनी खेळतेयं तुमच्या जीवाशी
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : शहरातील नवीन बस स्थानक मधून आडव्या गेलेल्या विद्युत तारा लोंबकडत असून शेकडो प्रवाशांचा जीव धोक्यात आहे.शहरातील बऱ्याच ठिकाणची सुद्धा समतोल परिस्थिती आहे.त्यामुळे महावितरण कंपनी अपघाताचा सिनेमा बघण्याच्या भूमिकेत दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी “शेकडो नागरिकांचा जीव घेण्याच्या प्रतीक्षेत महावितरण” या मथळ्यावर बातमी प्रकाशित करण्यात आली होती.परंतु लाखो नागरिकांचा विचार लक्षात न घेता या गंभीर समस्येकडे महावितरण कंपनी हेतूपरस्पर कानाडोळा करीत असल्याचे शहरातील नागरिकांमध्ये चर्चा आहे.त्यामुळे आता देखभाल व दुरुस्तीचा (आपत्ती व्यवस्थापन) मलिदा खाण्याचा यमरुपी महावितरणचा मानस तर नाही ना? असा प्रश्न आता लाखो नागरिकांसमोर उभा आहे…