
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा येथील शिवसेनेचे लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांच्या लोहा येथील जनसंपर्क कार्यालयास खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी भाजपचे लोहा -कंधार विधानसभा समन्वयक प्रविण पाटील चिखलीकर, सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे, शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार, माजी नगराध्यक्ष किरण वटमवार नगरसेवक छत्रपती धुतमल,, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बंडू पाटील वडजे, भाजपा विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळू पाटील कदम, भानुदास पाटील पवार,मंकरद पाटील पवार, सचिन मुकादम, शिवसेनेचे शहरप्रमुख युवराज वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी लोहा शहरांच्या पंरपंरेनुसार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा खारिक खोबऱ्याचा हार घालून भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व आगामी लोहा न.पा. च्या निवडणुकीच्या कामाला लागा असे खा. प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले…