दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे…
दि 25 जुलै (पुणे औंध )
औध येथील जिल्हा रुग्णांमध्ये महिलांसाठी नवजात बालकांना स्तनपानासाठी सन 2013-14 मध्ये विधान परिषदेचे सदस्य जयदेव गायकवाड यांच्या विकास निधीतून हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला.
परंतु तो आता नावापुरताच केला आहे का ? असा संतप्त सवाल मानवी हक्क संरक्षण जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर उपस्थित केला आहे. पदाच्या खुर्चीच्या रस्सीखेच मध्ये आणि राजकीय कुरगुड्यांच्या चक्रविवाहाच्या फेऱ्यात अडकलेल्या सर्वच राजकीय मंडळींना महिलांना हिरकणी कक्षाचे दुर्दशा दिसत नाही का? असा सवाल आण्णा जोगदंड यांनी उपस्थित केला. सर्व संस्थेचे पदाधिकारी अनेक वेळा जिल्हारुग्णालय मध्ये गेले असता हिरकणी कक्षच बंद अवस्थेत दिसला. त्या ठिकाणी कक्षाकडे जाण्यासाठी फक्त एक छोटा दिशादर्शक फलक आहे , माहिती फलक पण लावलेला नाही,
सामाजिक कार्यकर्त्या मीना करंजीवने म्हणाल्या की “महिला नवजात बालकांना घेऊन हिरकणी कक्ष शोधत जातात तेथे गेल्या वर हिरकणी कक्ष बंद असल्याचे लक्षात येते, मग आम्ही महिला आपल्या बाळाला स्तनपान उघडच करणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यां मिना करंजीवणे यांनी केला आहे.
आम्हां महिलांना पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त भाषणापुरतेच सन्मान दिला जातो, एकीकडे राजमाता जिजाऊ, माता रमाई, सावित्रीबाई फुले, फातिमा या महिलांची उपमा देऊन भाषणातून सन्मान दिला जातो तर दुसऱ्या बाजूला अशा हिरकणी कक्षाच्या माध्यमातून आमच्या महीलांची एकप्रकारची अवहेलना केली जाते, आमच्या साठी बालकांना स्तनपान करण्यासाठी सार्वजनिक जिल्हा रुग्णालयात उभारलेल्या हिरकणी कक्षच सध्या सलाइनवर आहे? हा प्रगतीपथावरच्या महाराष्ट्र आहे का ? विशाखा समितीचा फलक ही दिसत नाही तसेच महीलासाठी तक्रार करण्यासाठी हेल्पलाइन त्याठिकाणी कक्षाच्या बाजूला असावी असे मत महाराष्ट्र शासनाचे गुणवंत कामगार संगिता जोगदंड यानी व्यक्त केले.
