पावसाळी अधिवेशन सोडून आले शेतकऱ्याच्या बांधावर…
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी शिवकुमार बिराजदार
मुखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करते वेळेस आ. डॉ. तुषार राठोड यांनी प्रशासकीय
अधिकाऱ्यासह दिनांक 22 जुलै रोजी शनिवारी मुंबईहून थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले, आणि गुडघाभर चिखलातून वाट काढत भर पावसात शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, घाबरू नका मी व राज्य शासन, केंद्र शासन, तुमच्या पाठीशी आहे. हिम्मत हरू नका आपण पुन्हा सगळे उभे करू, असे अस्वस्थ केले. त्यांनी पूरग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे ते काही काळ व्यतीत झाले.
मुखेड तालुक्यातील जाहूर,पाळा, येवती, मेथी, तरददावाडी, यासह आणि गावांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन तासात जवळपास सुमारे 100 मी. मी पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे नागरिकांची मोठी दैना झाली. मुखेड तालुक्यातील पाळा येथील नागरिकांना उघड्यावर बसून रात्र जागून काढावी लागली, या वेळी पूरग्रस्तांना परिस्थितीचे वर्णन करताना आ डॉ. राठोड दुःख अनावर झाले. सलग तीन दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येवती येथील नागरिकांना मात्र सद्गुरु नराशाम महाराज महाराज मठ संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नदान केले जात आहे.
शासनाने पूरग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी यासाठी आपण राज्य व केंद्र सरकारकडे आग्रह धरू असे डॉ. राठोड यांनी यावेळी सांगितले…
