दैनिक चालू वार्ता अहमदपूर प्रतिनिधी
विष्णू मोहन पोले
लातूर/ अहमदपूर: 24 जुलाई सोमवार रोजी मॉडेल इंग्लिश स्कूल येथे नरकेसरी ,कायदे पंडित ,थोर तत्त्वज्ञानी ,शिक्षणतज्ञ , खगोलशास्त्रज्ञ ,.वेदशास्त्र संपन्न लोकमान्य बाल गंगाधर टिळक यांची 23 जुलै रोजी असलेली जयंती साजरी करण्यात आली. अधिक माहिती अशी की, आज दिनांक 24 जुलै सोमवार रोजी सर्व मान्यवर व शिक्षकांच्या उपस्थितीत शाळेच्या उपमुख्याध्यापिका आ. ठाकूर मॅडम, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख आदरणीय ज्योती मॅडम यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. थोर युगपुरुषांच्या अंगी असलेल्या उत्तम गुणांचे आचरण व्हावे या हेतूने इयत्ता पहिली ते आठवी विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात अनेक विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग नोंदवला व उत्तम सादरीकरण केले. स्पर्धा , स्पर्धेचे नियम याबद्दल माननीय कुमठेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वक्तृत्व हा उत्तम व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे त्यामुळे अशा स्पर्धांचे वेळोवेळी आयोजन करण्यात यावे अशी इच्छा प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक माननीय श्रीराम क्षीरसागर सर यांनी व्यक्त केली. स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे दोन्ही वरिष्ठांनी कौतुक केले व सर्व विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेसाठी मार्गदर्शन करण्यात आले. वंदे मातरम या मंत्राने वक्तृत्व स्पर्धेची सांगता करण्यात आली.
