
दैनिक चालु वार्ता
म्हसळा रायगड प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा – ३१ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवी वर्षाची सांगता सोहळा संपुर्ण देशभर”माझी माती माझा देश”या उपक्रमाअंतर्गत विविध देश हिताचे कार्यक्रम साजरे होत असताना म्हसळा नगर पंचायती मार्फत दिनांक ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट रोजी अनुक्रमे पंचप्रण शपथ,ध्वजारोहण,शिलाफळक अनावरण,वसुधा वंदन (अमृत वाटिका) कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत भारत देशाच्या शुर विराना वंदन करताना स्वातंत्र्य सेनानी सुंदर गोपाळ बिरवाडकर यांचे नातू गणेश वसंत बिरवाडकर यांना सन्मानित करण्यात आले याच बरोबर म्हसळा शहरातील सैनिक जितेंद्र नंदकुमार हेंद्रे मागील २० वर्षे सैन्यात कार्यरत असून सध्या तामिळनाडू येथे कार्यरत असल्याने वतीने त्यांचे वडीलांचा सन्मान केला तसेच भारतीय नौदल सेनेत १५ वर्षे सेवा करून सेवानिवृत्त अधिकारी महेंद्र जगन्नाथ मुद्गुल हे स्वतः उपस्थित होते त्यांनी नौदलातील त्याचे चित्तथरारक अनुभव ओघवत्या वाणीत विशद केले या वेळी उपस्थितांचे ऊर अभिमानाने भरून आले आणि डोळे पाणावले होते.आयोजीत केलेल्या सर्व उपक्रमांना मुख्याधिकारी विराज लबडे,नगराध्यक्ष असहल कादीरी,उपाध्यक्ष संजय दिवेकर,गटनेते संजय कर्णिक,गटनेते राखी करंबे,करनिर्धारण अधिकारी दिपल मुंडये,सभापती सरोज म्हशीलकर, सुमैया आमदानी,नगरसेवक नासीर मिठागरे,निकेश कोकचा,नगरसेविका चोगले, नगरसेविका दळवी,बशारत,आंग्रे,बाबु चाळके,अशोक सुतार,संतोष कुडेकर,मोरे,बोरकर आणि नागरीक व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हसळा नगर पंचायतीने आयोजीत केलेल्या देश हिताचे कार्यक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.