
सार्वजनिक आरोग्य विभागाचा फतवा, १५ ऑगस्ट पासून मोफत उपचार…
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नादेड(देगलूर);सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयात दाखल झाल्यास अनेकदा रुग्णाच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्याची चिठ्ठी दिली जाते. त्यामुळे पैसे आणि वेळ या दोन्हींचा अपव्यय होतो. या पार्श्वभूमीवर आता आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत १५ ऑगस्टपासून मोफत उपचार करण्यात येणार असून त्याबरोबरच रुग्णांना वा त्यांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे • आणण्याची चिठ्ठी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुग्णांना काही तक्रारी असल्यास १०४ या टोल फ्री क्रमांकावर त्याची नोंद करता येणार आहे.
आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त धीरज कुमार यांनी मोफत उपचारासंदर्भात सविस्तर पत्रककाढले आहे. त्यात १५ ऑगस्टपासून मोफत उपचारांची अंमलबाजवणी करण्यासंदर्भात सूचना करण्यात आली आहे. रुग्णांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद घेतली जाईल आणि संबंधित संस्था प्रमुखास सांगितले जाईल, प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण करण्याचीजवाबदारी संस्था प्रमुखाची असेल. औषध बाहेरून आणावे लागले तर? सार्वजनिक रुग्णालयात क्वचितप्रसंगी बाहेरील औषधे रुग्णास द्यावयाची गरज लागल्यास रुग्ण कल्याण समितीच्या अनुदानातून स्थानिकरीत्या औषध खरेदी करून रुग्णास मोफत औषधउपलब्ध करून द्यावे. तसेच आरोग्यसंस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचे आढळून आल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचान्यावर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची असेल, असे पत्रकात नमूद आहे.