
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
नादेड(देगलूर): देगलूर तालुक्यातील हणेगाव करडखेल मरखेल खानापूर परिसरात दुबार पेरणीमुळे शेतकरी संकटात सापडलेला असताना परत एकदा अतिवृष्टी व ढगफुटीमुळे अनेकांची पिके व शेती खरडून गेल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्यात शेतकऱ्यांचे या आसमानी संकटामधून परंतू न डगमगता कसातरी सावरत त्या पिकाला सांभाळत खुरपणे निंदन कोळपे खत औषधी करीत परत एकदा त्या पिकाला जीवदान देण्याचे प्रयत्न करीत असताना ऑगस्ट महिना चालू झाल्यापासून आजतागायत एकही थेंब पावसाचा नसल्यामुळे भरगच्च फुलात असलेले मुग उडीद सोयाबीन करपून जात आहेत तर सोयाबीन कापसाला दुपारच्यावेळेस न बघितलेलेच बरे असे वाटत असल्याची शेतकरी वर्गात चर्चा करीत आहेत.
परंतू हे सर्व संकट शेतकऱ्यांच्याच नशीबी का असे प्रश्न निर्माण होत आहे. अशा संकटातून सावरत असताना शेतकऱ्यांना शासनाकडून कसल्याच प्रकारचा अनुदान मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला असून जगावे की मरावे काहीच कळत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र सरकारला मेट्रोसिटीचे विकासाच्या कामाचे उद्घाटना मध्ये एवढे गर्क आहेत की त्यांना शेतकऱ्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळच नाही…