
दैनिक चालू वार्ता
हिमायतनगर प्रतिनिधी: राम चिंतलवाड
तालुक्यातील दैनिक एकमत चे जेष्ठ पत्रकार नाभिक समाजातील एक जेष्ठ व्यक्तीमत्व तसेच होमगार्ड पदावर कार्यरत असलेले परमेश्वर मारोतराव शिंदे तसेच सत्यप्रभा न्युज लाइव्ह चे मुख्य संपादक नागेश शिंदे यांचे वडिल आज दि.27ऑगस्ट 2023 येथे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज सायंकाळी 7 वाजता हिंदू स्मशानभूमी, लकडोबा चौक हिमायतनगर येथे आहे.
परमेश्वर मारोतराव शिंदे हे नाभिक समाजाच्या सामाजिक कार्यात नेहमी तत्पर असायचे, समाजातील विविध कार्यक्रमांत त्यांचा सहभागी असायचा.तसेच काही महिन्यांपूर्वी परमेश्वर शिंदे यांच्या मुलाचेही दुःखद निधन झाले होते, त्या दुःखातून थोडे फार सावरले नाही आणि आता शिंदे कुटुंबातील कुटुंब प्रमुख कर्ताधर्ता काळाआड गेल्यामुळे शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ईश्वराकडुन शिंदे कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची बळ मिळो. तसेच पत्रकार परमेश्वर मारोतराव शिंदे यांना दैनिक चालू वार्ता पत्रकार यांच्या कडुन भावपूर्ण श्रद्धांजली…