
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा. दवणे जालना
(मंठा):तालुक्यातील तळणी येथील घटना वानरांचा कळपाने एका वयोवृद्धावर हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी दुपारी तळणीत गावात घडली . या हल्ल्यात वयोवृद्ध शिवाजी त्रिंबकराव सरकटे ( वय ६१ वर्ष ) हे गंभीर जखमी झाले.
तळणी गावांत मोकाट वानरांचा मोठ्या कळप आहे. यातील एका वानरांचा कळपाने दुपारच्या वेळी वयोवृद्धावर घरासमोर अचानक हल्ला करत चावा घेतल्याने गंभीर जखमी केले. त्यांना अधिक उपचारासाठी मंठा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता , त्यांना जालना येथे उपचारासाठी हलविले असल्याची माहिती नारायण सरकटे यांनी दिली.