
अतिवृष्टीचा सहा लाख ३९ हजार शेतकऱ्यांना फटका पाच लाख हेक्टर क्षेत्र बाधित…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड( देगलूर):नांदेडमध्ये जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. हा फटका जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुके वगळता इतर १४ तालुक्यांतील ६ लाख ३९ हजार २८७ शेतकऱ्यांना बसला. यात जिरायती, बागायती व फळपिकांसह जमिनी खरडूनही नुकसान झाल्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविला. यात शेतीपिकाच्या नुकसानीबद्दल ४२० कोटी ४६ लाख तर जमिनी खरडून केल्यामुळे ३१ कोटी ७३ लाख अशी एकूण ४५२ कोटी २० लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे.नांदेडमध्ये जून महिन्यांत जेमतेम झालेल्या पावसानंतर जुलैमध्ये तुफान पाऊस झाला होता. हा पाऊस सर्वच तालुक्यांत बरसला. परंतु शेतीपिकांचे नुकसान मात्र कंधार व लोहा तालुका वगळात इतर १४ तालुक्यांत नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला होता. यात चार लाख ९० हजार ९८३ हेक्टरवरील जिरायती पिकांचे एक हजार ४९६ हेक्टर बागायती, तर २६० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात शेतीपिकाच्या नुकसानीबद्दल शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी ४२० कोटी ४६ लाख तर जमिनी खरडून केलेल्या आठहजार ७२३ शेतकऱ्यांना भरपाईसाठी ३१ कोटी तालुकानिहाय बाधित शेतकरी, नुकसान क्षेत्र व अपेक्षित निधी ७३ लाख रुपये अशी एकूण ४५२ कोटी २० लाख रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे केली आहे. हे सानुग्रह अनुदान जिरायतीसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे, फळपिकांसाठी हेक्टर २२ हजार पाचशे रुपये तर बागायती पिकांसाठी १७ हजार रुपये प्रतिहेक्टर दोन मर्यादिपर्यंत मिळणार आहेत.शेतीचे नुकसान झालेल्यांना३१ कोटी ७३ लाखसंपूर्ण जमिनी खरडून | गेलेल्या ५५२९ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ४७ हजार प्रमाणे २५ कोटी ९८ लाख, तर दुसऱ्याच्या शेतातील माती वाहून पिकांचे नुकसान झालेल्यांना ३१९१ हेक्टर क्षेत्राच्या शेतकऱ्यांना १८ हजार रुपये प्रतिहेक्टर प्रमाणे पाच कोटी ७४ लाख रुपये मिळणार आहेत. कंधार, लोहा तालुके कायम दुर्लक्षित जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार हदगांव पावसामुळे खरिपातील पाच लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्रशासनाने दिला आहे. परंतु यात कंधार व लोहा तालुक्यांत झाले नसल्याचा अहवाल शासनाला कळविला आहे. या दोन तालुक्यांतही अनेक शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.असे असताना नुकसान झाले नसल्याचा अहवाल शासनाच्या क्षेत्रीय यंत्रणांनी कळविलाआहे. त्यामुळे दोन तालुक्यांतील हजारो शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहिले आहेत. यापूर्वीही लोहा तालुक्यांना पीकविम्याची भरपाई मिळाली नव्हती. तालुकानिहाय बाधित शेतकरी, नुकसान क्षेत्र व अपेक्षित निधी(क्षेत्र हेक्टरमध्ये)