
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड ( देगलूर): बिलोली तालुक्यातील कुंडलवाडी शहरातील बँक ऑफ बडोदा कुंडलवाडी येथील ५३६ शेतकऱ्यांची कर्जाची रक्कम बरेच दिवसापासून प्रलंबित होती माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व बिलोली देगलूर मतदारसंघांचे आमदार जितेशभाऊ अंतापुरकर यांनी पावसाळी अधिवेशनाच्या वेळी सभागृहात प्रश्न उपस्थित केला व लक्षवेधी सुचना देखील केली. तसेच नरेश जिठ्ठावार, डॉ. शेगुलवार शाखा अधिकारी ज्ञानेश्वर शेंगोळे यांच्या पाठपुरावाने यांच्या प्रयत्नाने आज रोजी शेतकऱ्यांचे कर्जाचे रक्कम ५ कोटी ९ लाख रुपये अशी रक्कम जमा झाली असून. यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व आमदार जितेशभाऊ अंतापुरकर यांचे नागरिकांनी जाहीर आभार मानले.