आरोग्यसेवा, जीवनआवशक वस्तू वगळता बाजारपेठ पूर्णपणे बंद…
दैनिक चालु वार्ता
वैजापूर प्रतिनिधी भारत पा.सोनवणे –
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)- अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या वैजापूर तालूका बंदच्या आवाहनाला शहरातील व ग्रामीण भागातील सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे शहारातील सर्व बाजारपेठेत सकाळपासुनच शुकशुकाट दिसुन आला.
वैजापूर शहरातील टिळक रस्ता ही मुख्य बाजारपेठ निर्मनुष्य होती.शहरातील टिळक रोड, जुनी भाजी मंडई या प्रमुख बाजारपेठेसह मुख्य स्टेशन रस्ता, गंगापूर रस्ता, येवला रस्ता, लाडगाव रोड, मुरारी पार्क, डेपो रोड या भागातील सर्व दुकाने, हॉटेल्स व अन्य व्यावसायिक प्रतिष्ठाणे पुर्णपणे बंद होती नविन बसस्थानक परिसरात येवला रस्त्यावरील सर्व दुकाने बंद होती. पोलिस विभागातर्फे शहरातील आंबेडकर चौकासह सर्व प्रमुख रस्त्यांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.आरोग्यसेवा,जीवनआवशक वस्तू काही शाळा, महाविद्यालये, बॅका व सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरु होती. मात्र बंदमुळे तेथील उपस्थिती कमी होती व कामकाजावर परिणाम झाला होता. राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेस बंद होत्या. सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी व मराठा समाज बांधवांनी शहरात फेरी काढुन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करुन शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले.डॉ. दिनेश परदेशी, प्रशांत पाटील सदाफळ, अजय पाटील चिकटगावकर, पंकज ठोंबरे, प्रकाश चव्हाण, प्रशांत शिंदे, राजेंद्र साळुंके, प्रशांत त्रिभुवन, मंजाहरी गाढे, दिनेश राजपूत, पारस घाटे, ज्ञानेश्वर इंगळे, शैलेश चव्हाण, गणेश पवार आदींसह मराठा समाज बांधवांनी सकाळी ठक्कर बाजार पासुन टिळक रस्ता, शिवाजी रस्ता, जुनी भाजी मंडई, येवला नाका या भागातुन फेरी काढुन सर्व व्यापाऱ्यांना आपली दुकाने बंद ठेऊन शांततेत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.
