दै.चालु वार्ता
ज्ञानेश्वर साळुंके अंबड प्रतिनिधी
मनसे चे अध्यक्ष श्रीमान राज साहेब ठाकरे यांनी आंतरवाली सराटी उपोषण करते श्री मनोज जारंगे पाटील यांच्या उपोषणाच्या साहव्या दिवशी भेट देऊन, जवळपास पाऊण तास चर्चा केली सगळा विषय समजून घेतल्यानंतर साहेबांनी मार्गदर्शन करताना सांगितले गेंड्याच्या कातडीचे लोकप्रतिनिधीना काही फरक पडत नाही, या भाजप प्रेणित सरकारला एक माणूस गेल्याने काही फरक पडणार नाही, परंतु आपल्याला फरक पडतो महाराष्ट्र सह मराठवाड्यातील सकल मराठा समाजाला आव्हान केले, ज्यांनी माय मावल्यांवर मराठा आंदोलन कर्त्यावर गोळीबार करायला लावला त्या लोकांना मराठवाड्यात फिरू देऊ नका, ज्यांनी गोळीबार करायला लावला त्यांना निवडणुकीत विसरू नका, आरक्षण मिळण्या बाबत कायदे तज्ञ यांच्यासोबत चर्चा करणार आहे परंतु आज या ठिकाणी आरक्षण मिळेल हे मी सांगत नाही कारण मी खोटे बोलत नाही मला ते जमत नाही, पोलिसांवर हल्ले करू नका कारण पोलिसांना ज्यांनी आदेश दिला त्यांच्यावर मराठवाड्यात बंदी घाला म्हणून याच अनुषंगाने मराठा समाजासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात येते जोपर्यंत उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडवणीस राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही मंत्र्यांना मराठवाड्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना फिरू देणार नाही अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने घेण्यात आली आहे कारण ज्या मराठा माता भगिनींवर गोळीबार केला लाठी चार्ज केला त्यांच्यावर विनाकारण ३०७ चे गुन्हे दाखल केले त्यांच्यावरील त्वरित गुन्हे मागे घेऊन देवेंद्रजी यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टीला मराठवाड्यात बंदी करा. जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत इकडे पाऊल टाकून देऊ नका असे ठाकरे यांनी हल्लाबोल केला
*मुख्यमंत्र्यांची भेट घेणार*
मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी मी मुख्यमंत्री आणि तज्ञाशी बोलून बोलतो प्रश्न सुटण्यासारखे असेल तर नक्की सोडविल्या जाईल तुम्ही गोडीच्या कातड्याचे लोकांसाठी आपला जीव गमवू नका एक जण मेल तर त्यांना फरक पडणार नाही पण जीव आपल्यासाठी महत्त्वाचा आहे निवडणूक येतील तेव्हा असं काही गोष्टी समोर आणतील तेव्हा काठीचा पाठीवरील वळ लक्षात ठेवा असा आवाहन ठाकरे यांनी केलं यावेळेस अमित ठाकरे यांची उपस्थिती होती
