दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – आज दिनांक ०४/०९/२०२३ रोजी रायगड जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित म्हसळा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आनंददायी वातावरणात पार पडले.या स्पर्धांचे उद्घाटन म्हसळा तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार मा.श्री समिर घारे साहेब, पंचायत समितीचे गटशिक्षाधिकारी मा. संतोष दौंड साहेब, तालुक्याचे विस्तार अधिकारी श्री जगदीश घोसाळकर साहेब, प्राचार्य हाके, क्रीडा समन्वयक श्री. झाकीर हलसंगी सर, क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.देवराम डावखर सर,उपाध्यक्ष.श्री संदिप कांबळेकर, कार्याध्यक्ष श्री हनुमंत मोरे सर, सचिव श्री प्रफुल्ल पाटील सर, खजिनदार श्री रईस सर श्री गिरीश असवले सर, पत्रकार श्री अंगद कांबळे सर्व माध्यमिक, प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक,क्रीडा शिक्षक व खेळाडू यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.आज झालेल्या म्हसळा तालुका मुलींच्या कबड्डी स्पर्धेत कोकण एज्युकेशन सोसायटीची प्रभाकर नारायण पाटील माध्यमिक शाळेच्या १४ वर्ष वयोगट व १७ वर्ष वयोगट मुली या दोन्ही मुलींच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकावला.हे दोन्ही संघ रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धेमध्ये म्हसळा तालुक्याचे प्रतिनिधित्त्व करणार आहेत. या संघांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना आणि संघाला मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री दर्गे सर यांचे संस्थेच्या, शाळेच्या वतीने शाळेचे चेअरमन मा.श्री. बेडेकर साहेब, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री मधुसूदन पाटील साहेब,श्री स्वप्निल बिराडी साहेब, श्री अवधूत पाटील साहेब , श्री गोपीनाथ चव्हाण साहेब, श्री.गौऱ्या डांगे साहेब,श्रीमती शालिनीताई नाक्ती मॅडम,शाळेचे मुख्याध्यापक मा श्री.दिनेश चौरे सर,श्री. चाळके सर ,श्री पाडवी सर, श्री कांबडी सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री बांगारे या सर्वांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन व रायगड जिल्हा कबड्डी स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
