ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा २५ व्या रौप्य महोत्सव…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) : संत रुपलाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत गोकुळ अष्टमी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात आले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून अंजनगाव सुर्जी येथील बारगणपुरा स्थित संगत संस्थान येथे गोकुळ अष्टमी निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आयोजित करण्यात येते.यावर्षी सुद्धा २५ व्या रौप्य महोत्सवी श्रावण कृ.प्रतिपदा ३१ ऑगस्ट २०२३ शुक्रवार पासून ह.भ.प. सुभाष महाराज काळे (आळंदी देवाची) यांच्या वाणीतून ग्रंथ पारायण आरंभित करण्यात आले.या ज्ञानेश्वरी पारायणाच्या दैनंदिनी सकाळी ५ ते ६ काकडा,९ ते १२ आणि दुपारी ३ ते ५ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण व निरूपण,सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ,रात्री ८:३० ते १०:३० हरी कीर्तन असे या पारायणाची रूपरेषा आहे.या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायणाला लाभलेले गायनाचार्य श्री ह.भ.प.हरीओम महाराज शास्त्री (अमरावती),ह.भ.प.उमेश महाराज रावणकर (हरताळा),ह.भ.प.रमेश महाराज रंदे (अंजनगाव सुर्जी),ह.भ.प.विनोद महाराज आकोटकर (अंजनगाव सुर्जी),ह.भ.प.प्रथमेश महाराज अस्वार,ह.भ.प.कैलास महाराज येऊल,ह.भ.प. उमेश महाराज केदार आहेत.तर मृदुंगाचार्य ह.भ.प.माऊली महाराज डांगरे (आळंदी देवाची),ह.भ.प.सुनील महाराज दातीर,ह.भ.प.सतीश महाराज सोनटक्के आहेत.नगर प्रदक्षिणा ६ सप्टेंबर २०२३ गुरुवार रोजी ४:३० ते ७ वाजेपर्यंत राहणार आहे.
श्री ह.भ.प. सुभाष महाराज काळे, (वा.शि.संस्था आळंदी देवाची),यांचे काल्याचे कीर्तन सकाळी १० ते १२,दुपारी १ ते ५ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संपूर्ण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन संत रुपलाल महाराज वारकरी सांप्रदाय विश्वस्त मंडळ,श्री ज्ञानेश्वरी माऊली हरिपाठ मंडळ, हनुमान मंदिर संस्थान रजि.नं.४११ अंजनगाव सुर्जी व श्री हनुमान व्यायाम व क्रीडा मंडळ बारगणपुरा अंजनगाव सुर्जी यांचे द्वारे आयोजित करण्यात आले आहे.तरी भाविकांनी यथाशक्तीने पारायण कथा श्रवण व सेवा समर्पण करिता आयोजकांनी यावेळी आवाहन केले आहे.
