
दै.चालु वार्ता वृत्तसेवा
नांदेड (कंधार) कृषी उत्पन्न बाजार समिती कंधारचा निकाल जाहीर झाल्यानंतर बळीराजा परीवर्तन पॅनल ला प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात बहुमत प्राप्त झाले त्याप्रसंगी सायंकाळी कंधार येथील संपर्क कार्यालय येथे छोटेखानी आनंदोत्सव साजरा करत असताना आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले निवडणुकीमध्ये मी जरी प्रत्यक्ष नसलो तरी एक दिवस मतदानाच्या दिवशी दिवसभर ठिकठिकाणी बसून निरीक्षण व अभ्यास केला त्यामध्ये, कोणत्या गावात कोणी विरोध केलाय,.कोण मतदानाला आले नाही, सोबत राहून कोणी धोका दिला, इथपर्यंत ची यादी माझ्याकडे आहे त्यामुळे मला कोणी येवून मोठा हार घातला म्हणजे मतदान दिले नाही हे विसरून जाईल हे अजिबात समजू नये असा इशारा दलबदलू लोकांना खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिला आहे.