
दैनिक चालु वार्ता
म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थी हे आपल्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात. महान शैक्षणिक तत्ववेत्ता, आणि एक प्रख्यात मुत्सद्दी, विद्वान, भारताचे राष्ट्रपती आणि आदर्श शिक्षक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्याक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी शिक्षिका कु.सलोनी जैसवाल हिने केले व विद्यार्थी मनोगतात वैभव कामडी ,फैजान शहा,श्रेयशी माने,यांनी यांनी शिक्षक दिनाचे महत्व सांगून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षक मनोगत श्री.मुंडे सर यांनी शिक्षक शब्दाचा अर्थ सांगून गुरु व शिष्य यांच्यातील नाते स्पष्ट करून शिक्षक दिनाविषयी विचार मांडले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.हाके पी.एल कार्यक्रमाचे अध्यक्ष होते यावेळी आपल्या मनोगतात गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते कसे असावे व भविष्यात स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी परिश्रम करणे हाच एकमेव मार्ग आहे म्हणून विद्यार्थ्यामध्ये जिद्द व चिकाठी प्रामाणिकपणा असणे आवश्यक आहे. शिक्षक दिनानिमित्त विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाबपुष्प व पेन देऊन सत्कार केले.तसेच विद्यार्थी शिक्षक यांनी दिवस भराचे कामकाज उत्तम रित्या पार पाडून मुख्याध्यापक म्हणून अनुष्का चौव्हाण, पर्यवेक्षक म्हणून सृष्टी वाळवटकर , अर्जुन यादव व आदी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावून कामकाज पाहिले . कला शिक्षक श्री,बंडगर सर यांनी शिक्षक दिनाचे उत्तम फलक लेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली . कार्यक्रमाचे सूत्र संचालन कु.जान्हवी लोणशिकर हिने केले.आभार प्रदर्शन मृण्मयी सुतार हिने केले..कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षक श्री.कामडी व्ही.के.,श्री.तडवी आय.बी.,सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ.हाके ए.पी.,पर्यवेक्षक श्री.पाटील सर व गायकवाड सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले .