
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर); देगलूर तालुक्यातील जलजीवन मिशन व इतर पाणीपुरवठा योजनेच्या कामाअंतर्गत प्रत्येक गावात कामे चालू असून सदरील कामे हे अतिशय निकृष्ठ दर्जाचे करण्यात येत आहेत.
सदरील कामामध्ये संबंधित पाणीपुरवठा उपअभियंता राऊत हे प्रत्येक कामाकरीता टक्केवारीप्रमाणे रक्कम घेऊन गुत्तेदारांकडून बोगसरित्या कामे करून घेत आहेत. गुत्तेदारांचे बोगस एम. बी. करणे, तालुक्यातील ग्रामीण भागातील टंचाईच्या कामे संपूर्णपणे बोगसरित्या करून एम.बी. रेकॉर्ड टक्केवारीप्रमाणे रक्कम घेऊन करण्यात आलेले आहेत.
रमेश
देगलूरचे पाणीपुरवठा उपअभियंता राऊत हे तालुक्यातील काही जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 51912027 होत असलेल्या कामात दुसऱ्याच्या नावे टेंडर सोडून स्वतः कामे करीत आहेत, त्यांची बदली झाली असली तरी ते संबंधित अधिकाऱ्याशी हातमिळणी करून परस्पर बदली रद्द करून घेतले आहे. शासन करोडो रूपये खर्च करून ग्रामीण भागातील जनतेला पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाण्याची सोय करण्याकरीता अशा प्रकारचे योजना राबविण्यात येत असताना राऊत यांसारखे उप विभागीय अधिकारी या योजनेची पायमल्ली करीत आहेत. तसेच सर्व गुत्तेदारांना पाईपलाईन खरेदी ही कार्यालय, देखऊत यांनी सांगेल त्याच डिलर / विक्रेत्यांकडून घेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यावरून त्यांचे SEP 21हान खाण्याची प्रवृत्ती दिसून येते. आजतागायत त्यांनी एकही प्रत्यक्ष स्थळ पाहणी केलेली नाही, निवीदा प्रक्रियात नियमबाह्य पद्धतीने निवीदा वाटप करण्यत आलेले आहेत, .उपअभियंता राऊत हे कार्यालयात कधीच उपस्थित राहत नाहीत, घरी बसूनच काम पाहत असतात आणि टक्केवारीच्या लोकांना घरी बोलावून त्यांच्याकडून आगाऊ रक्कम घेऊन त्यांची नियमबाह्यरित्या कामे पार पाडतात. गुत्तेदार आगाऊची टक्केवारी दिला तर त्यांना कामे होण्या अगोदरच जास्तीचे कामे केल्याचे दाखवून त्यांचे नावे बोगस बिले तयार करून त्यांची बिले मंजूर केले जातात.
त्यामुळे सदरील पाणीपुरवठा उपअभियंता राऊत हे कनिष्ठ अभियंता असून सुध्दा उपअभियंता पद भोगत आहेत. त्या पदाच्या माध्यमातून लाखोंची माया गोळा केली असून यांच्या मालमत्तेची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांना सेवेतन तात्काळ निलंबीत करण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे स्टाईलने आंदोलने करण्यात येईल, असे निवेदनामार्फत सांगण्यात आले . त्यावेळी चंदू अक्यमवार
शहराध्यक्ष- म.न.से. देगलूर ता. देगलूर जि.नांदेड गजानन बरसमवार
जिल्हा उपाध्यक्ष म.न.से. देगलूर
ता. देगलूर जि.नांदेड आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते..