
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा/सुरेश ज्ञा. दवणे…
जालना मंठा :-भाजपा किसान प्रदेश सचिव राजेश मोरे यांचे तहसीलदारांना निवेदन निवेदनात असे म्हटले आहे की ई पिक पाहणी ॲपचे सर्व्हर डाऊन असल्या असल्यामुळे शेतकरी वर्गाची अतोनात परेशानी होत आहे त्यामुळे ई पीक सर्व्हर लवकरात लवकर चालू करण्यात यावे
निवेदनात पुढे असे म्हटले आहे की की, सध्या जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात कोरडा दुष्काळमय परिस्थिती झाली आहे. मंठा तालुक्यात तर १०० % टक्के कोरडा दुष्काळ आहे त्या करिता शासनाकडे शेतकऱ्यांनी, विविध पक्ष, संघटना मार्फत कोरडा दुष्काळ जाहीर करुन २५ % टक्के अग्रीम विमा रक्कम मिळणे करिता मागणी केलेली आहे परंतू शासनस्तरावर ई पिक पाहणीची नोंद अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे.
वास्तविक पाहता ई पिक पाहणी ॲपचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे नोंदणी करता येत नाही तसेच शासकिय योजना नोंद करता येत नाही, चालू वर्षाचा पेरा नोंद करता येत नसल्यामुळे पिक कर्जास अडचण निर्माण होत आहे अशा अनेक समस्या केवळ ई पिक पाहणी ॲपचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे आहे तालुक्यातील बहुतांश शेतकरी या समस्येमुळे अडचणीत आहेत. सदरील सर्व्हर हे जवळपास १ महिन्यापासून बंद आहे.
तेंव्हा आपणास नम्र विनंती की, ई पिक पाहणी ॲपचे डाऊन असलेले सर्व्हर तात्काळ सुरु करण्याचे आदेश देण्यात यावेत तसेच सर्व्हर बंद असलेल्या काळातील ई पिक पाहणी ची नोंद न घेता २५ % अग्रीम रक्कम शेतकऱ्यांची देण्यात यावी. या निवेदनावर भाजपा किसान प्रदेश सचिव राजेश मोरे यांची सही आहे.