
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी मंठा /सुरेश ज्ञा. दवणे.. जालना…
जालना (मंठा )तालुक्यातील हनवतखेडा येथील सकल मराठा समाजाचा सराटी अंतरवाली येथे मनोज जिरगे यांची भेट घेऊन पत्र देऊन आंदोलनासं पाठिंबा दिला आहे (दि.०१)सप्टेंबर रोजी मराठा समाज आरक्षणाच्या आंदोलकावर पोलीसाकडून झालेल्या आमानुष लाठीहल्याच्या निषेध नोंदवून आंदोलनास हानवतखेडा येथील सर्व गावकऱ्यांचा जाहीर पाठींबा दिला.
या पत्रात पुढे असे म्हटले आहे की राज्य सरकारने वारंवार आपल्या समाजावर अन्याय करून देखील आपण ताठ मानेने आंदोलन स्थळी उभे आहाता त्या बद्दल आपले मनासून अभिनंदन. राज्य सरकारकडून मराठा समाजाचा केवळ मता पुरता उपयोग होत आहे आणि आपल्या समाजाचे बहुतांश आमदार असतांना देखील आपल्याच समाजाला आरक्षण मिळत नाही ही अशितय शोकांतिका आहे.
आपण निवडून दिलेले आमदार /खासदार / मंत्री हे एकदा निवडून आले की, आरक्षण मिळायला पाहिजे एवढी घोषणा देतात मग आरक्षण मिळत का नाही या बाबत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेत संभ्रम निर्माण होत आहे. परंतू आपण एकाही संकटाला न घाबरता अगदी आपल्यांवर झालेल्या प्राणघातक हल्याला देखील आपण फेटाळून लावले आणि नव्याने आरक्षणा बाबत आंदोलन चालूच ठेवले त्यामुळे आमच्या सारख्या तरुणांना देखील प्रोत्साहन मिळाले आहे आम्ही खालील सह्या करणारे सर्व मराठा समाज बांधव आपल्या लढयात सामील आहोत आणि आम्हा सर्वांचा आपणास जाहीर पाठींबा दर्शवित आहोत.
यावेळी हनवतखेडा येथील सकल मराठा समाजाचे सतीश गणगे, प्रशांत गणगे, करण गणगे, अजय गणगे, बाळू वायाळ, प्रदीप गणगे आदींची उपस्थिती होती.