
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे….
पुणे (इंदापूर): कोतवाली पोलीस स्टेशन (जि.अहमदनगर) चे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली(तळेवाडी) येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
पोलीस क्षेत्रातील एक कर्तव्य दक्ष अधिकारी व इंदापूर तालुक्यामध्ये ज्यांची ख्याती सिंघम म्हणून होती असे, अहमदनगर जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक असे चंद्रशेखर यादव यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यातील शेटफळ हवेली तळेवाडी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकूण ४७ लोकांनी रक्तदान केले. या शिबिरासाठी ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते यांनी मोलाचे सहकार्य केले.