
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड (देगलूर):दिनांक 06/09/2023 वार बुधवार रोजी ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आले. यामध्ये सर्व मुलांनी राधा व कृष्णाचे वस्त्र परिधान करून शाळेत उपस्थित राहिले. मुलांनी विविध कृष्णाच्या गाण्यावर नृत्य सादर करत दहीहंडी फोडली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर सुजित बिरादार शाळेची सीईओ रामेश्वर सगरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख रामेश्वरी कदम प्राथमिक विभाग प्रमुख शिंदे राणी यांनी राधाकृष्ण प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.
मुलांनी कृष्ण गीत गाऊन कार्यक्रमात रंग आणली त्याचबरोबर प्राथमिक सर्व शिक्षकांनी कृष्ण पाळणा गाऊन जन्मदिनाचा उत्साह वाढवला. सर्व मुलांनी गोविंदा आला रे आला या गाण्यावर नृत्य करत मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा सोलंकर व भुवनेश्वरी कांबळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा पाटील यांनी मानले. यात विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली यामध्ये उत्कृष्ट राधा – कृष्ण माती पासून कृष्णाची मूर्ती तयार करणे, गायन, चित्रकला, अशा विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले व अतिशय उत्साही वातावरणात कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली.