
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी
नांदेड (देगलूर );माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या ताफ्यातील पोलिसाने आंदोलकाच्या पायावरून गाडीचे चाक घातल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशोक चव्हाण हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे शनिवारी गेले असता मराठा आंदोलकांनी त्यांच्यासमोर काही प्रश्न उपस्थित केले होते.”मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरू असताना तुम्ही सभा का घेता?” असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला होता. त्यानंतर ‘मी मराठ्यांचा निषेध व्यक्त करतो’ असं वक्तव्य चव्हाणांनी केल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्या समोरच त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला. त्यानंतर चव्हाणांचा ताफा जात असताना ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे…आंदोलकानी अशोक चव्हाणांना घेराव घातल्यानंतर त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. तर ताफा जात असताना पोलिसांच्या एका गाडीचे चाक आंदोलकाच्या पायावरून गेल्याची घटना घडली. एका आंदोलकाने ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. या घटनेनंतर मराठा आंदोलकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.”समाजाचा घटक म्हणून प्रश्न केलाय याचा राग आला म्हणून अंगावर गाडी घालून पुढं गेला. घटना नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद गावातील आहे असं सांगण्यात येतंय. नेमकं हा आरक्षणाचा विषय आहे का आणखी कशाचा सांगता येणार नाही पण नांदेडच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, या व्हिडिओतील घटना आरक्षणामुळे झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. काळे झेंडे दाखवताना आंदोलन कर्त्याच्या पायावर गाडी घातलेली ही घटना गंभीर आहे. ही घटना विचार करायला लावणारी आहे…