
जालना प्रतिनिधी आकाश माने
जालना – गेल्या १७ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगेंनी अखेर उपोषण सोडले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते त्यांनी ज्यूस पिऊन तयांनी उपोषण सोडले आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला आहे. त्यात आत्ता जरांगे यांनी १० दिवसाचा अधिक वेळ घ्या पण आरक्षण द्या म्हणत सरकारला 10 दिवस वाढवून दिले, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने याआधीच जाहीर केला आहे.
मनोज जरांगे यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक…
मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. धडाडीचे, निर्णय क्षमता असलेले, निर्भिड असे मुख्यमंत्री असून मराठा समाजाला केवळ तेच न्याय देऊ शकतात असे म्हंटले आहे.
सरकार आरक्षण देण्यासाठी कटिबध्द – मुख्यमंत्री शिंदे
ज्यूस पाजून जरांगे यांचे उपोषण सोडवल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सरकार मराठा समजास आरक्षण देण्यासाठी कटिबध्द असल्याचं सांगितले. जरांगे यांनी पुढील दोन तीन दिवस दवाखाण्यात उपचार घ्यावे व काळजी घ्यावी. गुन्हे मागे घेण्याबद्दल ही सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती ही त्यांनी दिली.
मीडियाने विश्वास घात केला…
सर्वपक्षिय बैठकीनंतर पत्रकार परिषदेपूर्वी व्हायरल झालेला व्हिडियो हा तोडून मरोडून तयार केला गेला असल्याचा आरोप करताना त्यानी मीडियावर विश्वास घात केल्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले, आम्हाला केवळ बैठकीतील मुद्दे मांडायचे होते इतर राजकीय किंवा ईतर मुद्द्यावर या पत्रकार परिषदेत बोलायचे नव्हते… अशा परिस्थितीत तील हा संवाद असल्याचं त्यांनी सांगीतले आहे…
राज्य सरकारला महिन्याभराचा अवधी देण्याचा निर्णय बुधवारीच मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जोपर्यंत येत नाहीत. तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी संध्याकाळीच मनोज जरांगेंना भेटायला जाणार होते. मात्र, त्याआधी त्यांनी राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले. आज गुरुवारी सकाळी येऊन मुख्यमंत्र्यांनी हे उपोषण सोडवले.