
गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य दत्ताभाऊ शेंबाळे यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन त्यांची नुकतीच काल दि.(२८) सप्टेंबर रोजी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा, प्रदेश कार्यकारिणी सचिवपदी निवड करण्यात आली.
दत्ताभाऊ शेंबाळे यांनी भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अखंडपणे प्रयत्न केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या शेतकरी शेताच्या दृष्टीने असलेल्या विविध योजना,अनेक उपक्रम अतिशय तत्परतेने ग्रामीण भागातील तळागाळातील खेड्यापाड्यातील वाडी वस्त्यांवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अतिशय उत्कृष्ट रित्या प्रयत्न केले.केंद्र व राज्यातील सरकारच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून लाभ मिळवून देण्यासाठी दत्ताभाऊ शेंबाळे यांनी प्रामाणिकपणे कार्य केले.यांच्या पक्षातील कार्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशानूसार प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मान्यतेने व विक्रांतजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या स्वाक्षरीने सदर निवड करण्यात आली.
दत्ताभाऊ शेंबाळे यांची भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा राज्य सचिव पदी निवडी बद्दल देविदास महाराज गीते, केरबा सावकार बिडवई, व्यंकट गव्हाणे, शिवसांब देशमुख,प्रकाश दळवी, केरबा केंद्रे, साहेबराव काळे, बालाजी पाटील पवार,रामेश्वर पाटील पवार,गजानन पाटील मोरे,तुळशीराम लुंगारे,असंख्य चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री सूर्यकांता पाटील, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते एकनाथ दादा पवार,आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार,आ. तुषार राठोड,आ.भीमराव केराम,भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर,महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, संघटन मंत्री संजय कौडगे यांच्यासह नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीचे काम करण्याचा प्रयत्न करणार आहे .
– दत्ता भाऊ शेंबाळे