
पोई तांडा रास्त भाव दुकानदार विरुद्ध तक्रार अर्ज दाखल..!
दै.चालू वार्ता
प्रतिनिधी,उमापूर कृष्णा जाधव
गेवराई, तलवाडा, गेवराई शहरा नजीक पोई तांडा येथील निलंबित स्वस्त धान्य दुकान संलग्न रोकडा तांडा येथे जोडलेल्या स्वस्त धान्य दुकानदार नामे अंकुश वाचू राठोड हे पात्र शिधापत्रिका धारकांना शासनमान्य धान्य दर महिना वाटप करत नसून, यांच्या विरोधात तक्रार दाखल.
कधीतरी वाटप करतात तर कधी चढ्या भावाने धान्य देतात, कधीही धारकांना पावती देत नाही.स्वतः राशन धारकांच्या घरी फिरून ती धान्य मशीनला अंगठा मारतात.
अंगठा घेऊनही ते धान्य देत नाही.
सप्टेंबर 2023 गौरी गणपती आनंदाचा शिधा वाटप करताना राशन धारकांकडून प्रत्येकी 110 रुपये घेतले गेले असून, व काहीच रेशन धारकां कडून ईपास मशीनला अंगठे लावून घेतले.पावत्याही काढल्या परंतु 70 ते 80%टक्के लोकांना पावत्याच दिल्या नाही ना आनंदाचा शिधापावत्याच दिल्या नाही ना आनंदाचा शिधा पावत्याच दिल्या नाही ना आनंदाचा शिधाची किट दिली.
सर्रास पणे गोरगरिबांचे राशन धान्य काळ्या बाजारात विकले जाते.
व या राशन दुकानातून राशनव या राशन दुकानातून राशनव या राशन दुकानातून राशनधारकांना हक्काचे राशन शासन नियमाप्रमाणे रीतसर वाटप केलेे नाही.
*पोई तांड्यातील सर्व राशन धारकांनी तक्रार अर्ज दाखल केले आहे.* पुढाऱ्यांना हाताशी धरून सरळ सर्रास काळ्या बाजारात गोरगरिबांचे धान्याची विक्री केली जाते. येथील राशन धारकांपैकी 80टक्के गोरगरीब राशन धारकांनी आपल्या हक्काच्या राशन दुकानात विरोधात आवाज केल्याने गावातीलच स्वयंघोषित पुढारी व
तक्रारदार यांना हाताशी धरून
यांच्यामार्फत दुकानदाराची बाजू घेऊन सदरील लोक तक्रारदारांना अरेरावीची भाषा करतातत.
गावातीलच राजकीय पुढार्यांमुळे व दुकानदार अंकुश वाचू राठोड हे सदरील स्वयंघोषित पुढारी व तक्रारदार यांच्या अधिनस्तअसल्यामुळे दुकानदाराच्या गैरहजेरीत स्वतः आम्हीच दुकानदार आहोत.या आर्वी भावाया आर्वी भावात राहून तक्रारदार व स्वयंघोषित पुढारी स्वतःच्या भावाच्या घरात धान्य साठवून ठेवून,
मुजोरी करतात.
परंतु या स्वयंघोषित पुढारीला
गावातील राशनधारक कदरले असून,
तक्रारदारांच्या भावाला धान्य साठवण्याची बेकायदेशीर परवानगी दिली कोणी….??
अंकुश वाचू राठोड यांना संलग्न दुकान जोडून स्वतः प्रत्येक कार्डधारकांनाधान्य वाटपाच्या आदेशात कोणीही धान्यापासून वंचित राहू नये असे दुकान संलग्न करून देण्यात आलेल्या अधिकारात स्पष्ट म्हटले आहे.
असे असताना देखील दुकानदार अंकुश वाचू राठोड यांनी सदरील आदेशाचे उल्लंघन केले आहे.
सदरील दुकानदाराची सखोल चौकशी करून तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी.
नसता सर्व पोई तांडा नागरीक
व गोरगरीब राशनधारक लोकशाही मार्गाने तहसील कार्यालय समोर आंदोलन करण्यात येईल.
आणि आपण आपल्या अधिकारातून योग्य ती जनहिताची कार्यवाही करावी.अशी मागणी समस्त राशनधारक व ग्रामस्थांकडूनन होत आहे.