
दैनिक चालु वार्ता
भारत पा.सोनवणे वैजापूर प्रतिनिधी
वैजापूर (छत्रपती संभाजीनगर)-छत्रपती संभाजीनगरातील खासगी रुग्णालयात उपचार
घेताना मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद
साधला.२४ तारखेपर्यंत मी कुणावर बोलणार नाही. त्यानंतर मराठा समाज कोण आहे, हे सगळ्यांना कळेल. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही मिळाले तर पुढील लढ़ाईसाठी आम्ही सज्ज आहोत,मराठा समाजाला सरकारने दिलेल्या शब्दाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. सरकारने आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिलं होतं, असे जरांगे यांनी म्हटलं. ऊद्या दि.१७ डिसेंबरच्या बैठकीत आमची आंदोलनाची पुढील दिशा ठरणार आहे. सरकारने आम्हाला जे लिहून दिलें होतं, त्यानुसार सरकारने ऊद्यापर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होतं. मात्र अद्याप तसं काहीही आम्हाला मिळालेलें नाही. जर ऊद्यापर्यंत आम्हाला आरक्षण बाबतचा आदेश मिळाला नाही. तर, तुमचा- आमचा विषय संपला. गुन्हें मागे घेऊ हा शब्द पाळायचा नव्हता तर दिला कशाला? असा सवाल करत तुम्हाला है महागात पड़ेल कारण करोडो मराठे एक झाले आहेत ऊद्याच्या बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत. तसेच, मीडियाला आमच्याकडे असलेले सर्व कागदपत्र आणि व्हिडिओ देणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहेत…