
रत्नागिरी शिक्षण विभागाचा कारभार ढिम्म.
रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्हयातील प्राथमिक विभागा मधिल राजापूर गटशिक्षणाधिकारी सन्मा.भोसले यांना शिक्षण अधिकारी यांनी कार्यवाहीसाठी आदेशित केलेले पत्र क्र.४८२/२०२३ दि.२०/०१/२३ च्या पत्रावर आज तागायत उत्तर न देता,वरिष्ट अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.आणि याच विषयी माहिती अधिकार महासंघ चे महाराष्ट्र सचिव समिर शिरवडकर यांनी राजापूर गटशिक्षणाधिकारी श्री उत्तम भोसले यांच्यावर दप्तर दिरंगाई अधिनियम २००६ नुसार कार्यवाही करण्यासाठी जावक क्र.८१५/२०२३ दि.१४/०९/२३ रोजी पत्रव्यवहार केला होता.
वरील,पत्रव्यवहार माननीय शिक्षण अधिकारी प्रथमिम विभाग रत्नागिरी यांनी सुद्धा आज पर्यंत कोणतीहि कार्यवाही केली नाही.आणि म्हणुन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे महाराष्ट्र सचिव श्री समिर शिरवडकर यांनी त्या पत्राबाबत माहिती अधिकार दि.२६/१०/२३ रोजी दाखल केला.परंतु या माहिती अधिकाराला सुद्धा शिक्षण विभागाने केराची टोपली दाखवली आहे. माहिती अधिकार कायदा शिक्षण विभाग गंभीर पणे घेत किव्हा नाही,की माहिती अधिकार अधिनियमाचा अभाव आहे का असा प्रश्न निर्माण होतो.आज पर्यत कोणतीही उत्तर नसलेलं माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम १९(१) नुसार प्रथम अपील आज दिनांक १५/१२/२३ ला शिक्षण विभाग रत्नागिरी याना दाखल केला आहे.