दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- शिवशंकर ट्रस्ट महादेव मंदिर बोरी बु.ता. कंधार जि. नांदेड च्या वतीने आयोजित भव्य भागवत कथा अखंड हरिनाम सप्ताह व गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. काकडा भजन ४ ते ६ ,गाथा पारायण ६ ते १० , गाथा भजन १० ते ११ ,भागवत कथा ११ ते २, महाप्रसाद २ ते ६ ,हरिपाठ ६ ते ७, महाप्रसाद रात्री ७ ते ८ , दररोज कीर्तन ९ ते ११ दि.१८ डिसेंबर सोमवार ह.भ.प.मधुसुधन महाराज कापसीकर यांचे किर्तन आहे.दि.१९ डिसेंबर मंगळवार ह.भ.प.विष्णू महाराज तांदळीकर यांचे किर्तन आहे.दि.२० डिसेंबर बुधवार ह.भ.प.नामदेव महाराज दापकेकर यांचें किर्तन आहे.दि.२१ डिसेंबर गुरूवार ह.भ.प.तुकाराम शास्त्री टोकवाडीकर (परळी) यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० ते दुपारी १२ पर्यंत आहे.परीसरातील सर्व महाराज मंडळी,गायक,वादक, टाळकरी,विणेकरी सात दिवस उपस्थित राहतील.भागवताचार्य ह.भ.प.रोहीदास महाराज कळकेकर यांची भागवत कथा दररोज,गाथा भजन प्रमुख ज्ञानोबा माऊली गुंडेवाडीकर, हरिपाठ ज्ञानोबा माऊली उमरजकर वारकरी शिक्षण संस्था व ह.भ.प.लहु महाराज भजनी मंडळ मोहजा परांडा ता.कंधार ,काकडा प्रमुख हरनाळी, कळका व हिब्बट , सप्ताहाचे नियोजक श्री.प्रविण पाटील चिखलीकर, श्री.बाबुराव केंद्रे उमरगेकर, श्री.बालाजी पाटील मारतळेकर, श्री.बालाजीराव झुंबाड बोरीकर सर्व सप्ताहाचे प्रकाशन सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर व सौ.माधुरी देवानंद सांगवे यांनी केले आहे.शिवशंकर ट्रस्ट, महादेव मंदिर बोरी बु.च्या वतीने विवाह सोहळ्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.श्री. क्षेत्र महादेव मंदिर बोरी बु.हे गाव कंधार ते मुखेड रोडवर कळका फाट्यापासून उत्तरेला ५ की.मी.अंतरावर आहे.मंडप सौजन्य शिवराज पाटील कळकेकर, स्थळ महादेव मंदिर बोरी बु.ता.कंधार सर्व कार्यक्रमाचे आयोजक खा.प्रतापराव पाटील चिखलीकर अध्यक्ष शिवशंकर ट्रस्ट महादेव मंदिर बोरी बु. व समस्त गावकरी मंडळी बोरी बु,कागणेवाडी, कळका,कळकावाडी,नावंदेवाडी,टोकवाडी,मंगनाळी,वाखरड,वाखरडवाडी,पिंपळाचीवाडी ता.कंधार जि.नांदेड यांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.