
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड शहरातील सराफा भागातील इतवारा बाजार पेठेतील भांड्याच्या दुकानासमोर इरफाना बेगम यांनी बॅग विसरून गेल्या होत्या.थोड्या वेळाने तेथे सौ.सारीका हातवळणे व सरजू हातवळणे आले.त्यांना ती बॅग दिसली त्यांनी बॅग उघडून बघितले त्यामध्ये एक तोळ्याचे गंठल, एक तोळ्याची अंगठी,७ हजार पाचशे रुपये नगदी, एक मोबाईल, एक नवीन ड्रेस असल्याचे त्यांनी पाहिले व पत्रकार मित्राला फोन करून घडलेल्या सर्व वृत्तांत सांगितला पत्रकार मित्रांनी पोलिसांना बॅग सापडल्याचे सांगितले. नांदेड शहरात आजघडीला माणुसकी इमानदारी अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण पाहायला मिळाले आहे सोन्याच्या वस्तू मोबाईल पैसे ड्रेस असलेली बॅग लक्ष्मीनगर देगलूर नाका येथील पती-पत्नी सो सारिका सरजू हातवळणे ,श्री सरजू नागोराव हातवळणे यांनी पत्रकार मित्राच्या मदतीने पोलिसांना दिली इतवारा पोलीस स्टेशनमध्ये इरफाना बेगम शेख गफार राहणार मेहबूबनगर नांदेड यांनी बँग गहाळ झाल्याची नोंद केली होती. त्यामुळे पोलिसांनी ती बॅग इरफाना बेगम यांना सरजू हातवळणे ,सारिका हातवळणे यांच्या हस्ते देण्यात आली आणि सरजू हातवळणे व सारिका हातवळणे यांचा इतवारा पोलीस स्टेशनच्या वतीने व इरफाना बेगम यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यांच्या इमानदारी बद्दल कौतुक करण्यात येत आहे सर्वत्र त्यांचीच चर्चा होत आहे.