
दैनिक चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
“मुक्या अनाथ जनावरांच्या तोंडातला घास हिसकावणार्यांना नियती माफ करणार नाही”:- गौरक्षक उमेश भाऊ पोखरकर
अंबाजोगाई येथे आशा दत्त गोशाळेचे अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर हे स्वखर्चातून अनाथ गाईंना आपल्या गो शाळेत पालन करून गोमातेचे रक्षण करत असतात त्यासाठी मुख्य अनाथ जनावरांना चारा लागत असल्यामुळे त्यांनी चाऱ्याची सोय करण्यासाठी
जवळपास ९० हजार रुपये चा कडबा ज्या ठिकाणावर ठेवला होता तो काल रात्रीच्या दरम्यान काही अज्ञातांनी पेटवून दिल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये आशा दत्त गोशाळेचे अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांनी दिली. त्यांना सदर घटनेची माहिती विचारली असता त्यांनी असे सांगितले की :-
गोसेवा कशी करावी हा प्रश्न मला पड़लाय …?
काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास काही समाजकंटक यांनी
आम्ही करत असलेल्या गोसेवा बद्दल ज्यांच्या पोटात आग उठते ज्यांना आम्ही गोसेवा केलेली जमत नाही म्हणून जाणून बुजून आमच्या आशा दत्त गोशाळेतील गाईंचा उन्हाळ्यासाठी ठेवलेला तीन हजार कडबा भर रात्री पेटवून देण्यात आला असा कोणता नराधम असेल? आम्हाला विरोध करावा हिंदू देवी देवतांचे मुख्य असलेली गोमाता ला उपास मारण्याची वेळ त्यांनी आणू नये कारण तुम्ही जरी गाईंचा चारा संपवला तरी ईश्वर हा देणारा आहे हे त्यांनी लक्षात राहू द्यावे तुम्ही जरी हे चारा जरी जाणूनबुजून जाळला असला गाईंच्या तोंडाचा घास संपवण्यामध्ये त्याच्यामागे कोण उभा आहे हे आम्हाला समजलं पाहिजे कारण आज आम्हाला कसल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना सुद्धा आज आम्ही शेकडो गाई स्वतःच्या जीवावर संभाळ करतो ते सुद्धा जर ह्या नालायक इसमाला जमत नसेल तर त्यांना त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल अशा घटनेचा मी जाहीर निषेध करतो व ज्यांनी कुणी हे चुकीचे कृत्य केलं त्यांच्यावर लवकरात लवकर पोलीस बांधव कारवाई करतील अशी आशा आशा दत्त गौ शाळेचे अध्यक्ष उमेश भाऊ पोखरकर यांनी व्यक्त केली.