
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/लोहा:- लोहा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रयोगाचे सादरीकरण उत्तम प्रकारे केले होते .पंचायत समिती गट साधन केंद्र लोहा यांच्या वतीने ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विस्तार अधिकारी श्री टेकाळे साहेब डॉ. मोटे साहेब केंद्र प्रमुख फसमले सर, केंद्र प्रमुख शेख सर यांनी संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची पाहणी करून प्रयोगाची माहिती घेतली या विज्ञान प्रदर्शनाचे योग्य नियोजन करून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन यशस्वी केले त्याबद्दल त्यांचे समाज उन्नती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री मारोतीराव पाटील घोरबांड मुख्याध्यापक श्री एस.एन. मामडे सर ,प्राध्यापक ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांनी आभार मानले आहेत.यावेळी संजय गांधी विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री चक्रधर कदम सर व श्री अनिल कदम सर यांनी विद्यार्थ्यासोबत विज्ञान प्रदर्शनात सहभागी होऊन विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.शाळेच्या वतीने सहभागी विद्यार्थ्याचे शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.