
प्रतिनिधी/राखी मोरे
दै.चालु वार्ता/पुणे
पुण्यातील सासवड चिव्हेवाडी घाटात ट्रक आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे. सासवड-भोर मार्गावरील चिव्हेवाडी घाटामध्ये हा भीषण अपघात झाला आहे.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला आहे.गणेश लेकावळे आणि तृप्ती जगताप अशी अपघातात मृत पावलेल्या लोकांची नावे आहेत.या अपघातामधून व्हॅगनार कारच्या मागे बसलेल्या ज्येष्ठ महिला आणि लहान मुलगी या थोडक्यात बचावल्या आहेत.घाटातून धान्य घेऊन जात असताना ट्रक अचानक कारवरती पलटी झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.हा अपघात एवढा भीषण होता कि, धान्याने भरलेला ट्रक पलटी झाल्यानंतर व्हॅगनार कारचा चक्काचुर झाला आहे. चिव्हेवाडी घाटातील वळणाचा अंदाज चालकाला न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळं हा अपघात झाला आहे. या अपघातानंतर सासवड-भोर या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.व्हॅगनर कार व धान्याने भरलेला ट्रक यांच्यामध्ये ही अपघाताची घटना घडली आहे.