प्रतिनिधी/राखी मोरे
दैनिक चालु वार्ता/पुणे
पुण्यातील वस्तू संग्रहालयातील वरिष्ठ व्यवस्थापकाची महिला अधिकाऱ्याकडे अजब मागणी.
पुण्यातील महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग झाला आहे. वरिष्ठ व्यवस्थापकानेच हे कृत्य केले आहे.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
फक्त एक ”किस” दे म्हणत महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी महिलेचा विनयभंग केला. महात्मा फुले वस्तु संग्रहालयामध्ये काम करणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याकडे ”कीस” मागत तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 13 डिसेंबर रोजी दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली. राजीव विनायक विळेकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 70 वर्षीय विनायक हे डेक्कन येथील प्रभात रोड परिसरात राहतात.
याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी भादवि 354 अ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 39 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पिडीत महिला महात्मा फुले संग्रहालयात अधिकारी आहे. आरोपी हा वरिष्ठ व्यवस्थापक आहे. विळेकर हे या महिलेच्या टेबलजवळ गेले. त्यांना जवळ ओढून त्यांना ” एक कीस दे” असे म्हणाले. महिलेने त्यांना असे करण्यास नकार दिला. त्यानंतर देखील त्याने हाच धोशा सुरू ठेवला. त्यानंतर ”तुला प्रॉब्लेम असेल तर आपण दरवाजा लावून घेऊ” असे म्हणत बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला.